Ladki Bahin Yojana Update: 28 March Payment Started, ₹6000 किंवा ₹4500 कोणाला मिळणार?

लाडकी बहिण योजना: नमस्कार लाडक्या बहिनिंनो आज २८ मार्च पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता जमा होणार आहे. हि वितरण करण्याची प्रक्रिया ३१ मार्च पर्यंत सुरु असणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणीच्या खात्या मध्य हा हफ्ता जमा होणार आहे. पण लाखो लाडक्या बहिणी असे आहेत त्याची ekyc चुकीची झाली होती आणि त्यांना लाडकी बहिण योजनेचा नोव्हेंबर पासून हफ्ता मिळालाच नाही. महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी अस्या लाडकी बहिणीसाठी एक संधी दिली आणि ekyc दुरुस्ती करण्यासाठी पोर्टल चालू केल होत. ह्या संधीचा फायदा पुष्कळ लाडक्या बहिणींनी घेतला आणि आपली चुकीची ekyc दुरुस्ती केली. पण ekyc दुरुस्त केल्यानंतर हि लाडक्या बहिणीच्या खात्यात आतापर्यंत हफ्ता जमा झाला नाही. पण आता कॅबिनेट बैठकीत या विषय वर चर्चा करून लाडक्या बहिणीचं खात्यात फेब्रुवारीच्या हफ्त्यासोबत रखडलेले हफ्ते पण देण्यात यतील असी घोषणा केली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आता महत्वाचा प्रश्न म्हणजे असा कि कोणत्या लाडक्या बहिणीला ६००० मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यात ४५०० रुपये जमा करण्यात यहील याची माहिती या लेख मध्य तुम्हाला पूर्ण समजून सांगणार आहोत हा लेख सेवट पर्यंत वाचा.

फेब्रुवारी महिन्यात ekyc केली त्या लाडक्या बहिणीच्या खात्यात ४५०० जमा होणार

फेब्रुवारी २०२६ पासून (सुरुवातीला ६ फेब्रुवारी २०२६ रोजी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही घोषणा केली). सरकारने ३१ मार्च २०२६ ही शेवटची मुदत ठेवली आहे. म्हणजे आज (२८ मार्च २०२६) पर्यंत फक्त ३ दिवस शिल्लक आहेत! ज्या लाडक्या बहिणींनी फेब्रुवारी महिन्याच्या २० तारखेच्या आत ekyc दुरुस्ती केली अस्या लाडक्या बहिणीच्य खात्यात जानेवारी महिन्याचा १५०० खात्यात जमा करण्यात आले होते. तर अस्या लाडक्या बहिणीच्या खात्यात नोव्हेंबर, डिसेंबर आणि फेब्रुवारी महिन्याचे ४५०० रुपये आता खात्यात जमा करण्यात येणार आहे.

कोणत्या लाडक्या बहींच्या खात्यात जमा होणार ६००० रुपये

ज्या लाडक्या बहिणींनी २० फेब्रुवारी च्या नंतर ekyc दुरुस्ती केली होती त्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हफ्ता नाही जमा करण्यात आला होता. तर अस्या लाडक्या बहिणीच्या खात्यात नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, आणि फेब्रुवारी चे मिळून एकूण चार हफ्ते ६००० खात्यात जमा करण्यात येणार आहेत.

रखडलेले पैसे केव्हा पर्यंत जमा होणार?

लाडक्या बहिनिंनो आज २८ तारीख पासून वितरणाची प्रक्रिया सुरु झाली आहे. अदिती ताई तटकरे यांनी x वर पोस्त करून सांगितलं आहे कि २८ मार्च पासून ३१ मार्च पर्यंत सर्व लाडक्या बहींच्या खात्यात फेब्रुवारी आणि त्यांचे सर्वे रखडलेले हफ्ते जमा करण्यात येणार आहे.

EKYC दुरुस्तीची शेवटची संधी – ३१ मार्च २०२६ पर्यंत

योजनेच्या अंमलबजावणीत eKYC अनिवार्य करण्यात आली. मात्र, eKYC करताना अनेक बहिणींनी नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला. यामुळे नोव्हेंबर २०२५ पासून अनेकांच्या हप्त्यांचे वितरण थांबले होते.

मोठी बातमी: सरकारने eKYC दुरुस्ती करण्यासाठी ३१ मार्च २०२६ ही शेवटची मुदतवाढ दिली आहे. ज्या बहिणींची eKYC अडकली होती किंवा चुकीची झाली होती, त्यांनी तातडीने दुरुस्ती करावी.

अधिकृत वेबसाइट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/

Leave a Comment